स्वार्थींचें षडयंत्र

This time wrote it in Marathi language.

फक्त गरजे वेळी तुमची मदत घेऊन

इतर वेळी तुम्हाला किंमत न देणारी माणसं

जणू एक विषाणू असतात.

आम्हाला तुझी काळजी आहे,

खूप काळजी आहे,

आमच्या जवळ ये

असं म्हणून वाईट काळात दूर जाणारी माणसं

खोट्या नात्यांचा मुखवटे सतत घालतात.

आयुष्यात जे फक्त गैरफायदा घेतात

स्वतः पुढे जाताना तुमची पूर्णपने मदद घेऊन

मात्र तुम्हाला पुढे जाताना मागे ओढणारे गलिच्छ असतात.

स्वार्थीवृत्तीकडून प्रेमाची अपेक्षा करणे दूर कारण

त्यांनी माणुसकीचा धडा कधी शिकलाच नाही.

अशी माणसं शिक्षण घेऊन हि

ह्यांची ओळख अशिक्षित बरे .

जेव्हा जगण्याचे हाल होतात

तेव्हा सुद्धा हीच माणसे

तुमच्या पाठीत सूरी घालून

तुमची मदत तुमच्या शेवटच्या श्वासापर्यन्त घेतील

हे तीच ती माणसं.

जे जीवनाचा व माणुसकीचा मूल्य विसरून

दुसर्यांना समान न वागवून

ज्यांना काडीची लाज लज्जा नाही

तेच स्वतः खालच्या पातळीवर असतात .

अश्या माणसांना नेहमी आसरा देऊन

आपणच निस्वार्थीचा रेषा ओलांडली असो.

अविश्वाशी नात्यांवर विश्वास दाखून

आपण निवळ स्वतःलाच त्रास देतो.

जे ह्या स्वार्थींच्या षडयंत्रात हारलेत

त्याना चांगुलपणा दाखवायला

खोटी नाती कुणालाच नको ,

खरी माणसी हवं

मनाची निर्मळ असलेले,

नात्यांचा व्यवसाय न करून

जीवाला जीव लावणारे काळीजे.

प्रेमाचा चांगुलपणाचे खरी किंमत देणारे

निर्दयी सर्वसाधारण माणसे.

सोपं आहे हे जीवन

परंतु स्वार्थींने अडथळे निर्माण करणे सोडले तर …
-ShubhiPatil(www.thepsychologicalworld.com)

Leave a Reply. I am happy to hear your thoughts on this post.

Up ↑

%d bloggers like this: